कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही! अजित पवारांचे आव्हान

ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

पुणे जिल्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आणि दोन दिवसात पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांना यावेळी सांगितले. तसेच कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही!, अशा शब्दांत विरोधकांना आव्हान दिले.

मी वाटच पाहतोय की, सरकार कधी पडतंय!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठून बघतो की, पडलं का काय सरकार’, असे वक्तव्य केले.  चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. पाटील म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे. अमकंय-तमकंय. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचे. आपले मात्र दुरून डोंगर साजरे. मी वाटच पाहतोय की, सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो आणि पाहतो की, पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव, कितीदा सांगायचं की, हे तीन नेते एकत्र आहेत, तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

(हेही वाचा : पुण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 8 पोलिस निलंबित!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here