ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. त्यांच्याशी आता माझे वैचारिक मतभेद आहेत. ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कोणी माझा फोटो वापरू नये. जिवंतपणी माझा फोटो कोणी वापरावा हा माझाच अधिकार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठणकावल्याचे समजते. त्याचसोबत अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांचे फोटोही आपल्या कार्यकर्त्यांनी न वापरण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यभरात अजित पवार व इतर नेत्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले. त्यावर शरद पवार यांचे फोटो लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या होत्या. सोमवारच्या पत्रकारपरिषदेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यावर आता शरद पवार यांनी हा इशारा दिल्याचे समजते.
माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी माझे फोटो वापरू नयेत. जिवंतपणी माझा फोटो कोणी वापरावा हे ठरविण्याचे अधिकार माझे आहेत. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कोणीही माझे फोटो वापरू नयेत असे शरद पवार यांनी बजावले आहे. त्याचसोबत अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे जे नेते गेले आहेत त्यांचेही फोटो आपल्या कार्यकर्त्यांनी वापरू नयेत असेही शरद पवार यांनी बजावले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षातील या बंडाविरोधात दंड थोपटल्याचे समजते. आपण जनतेत जाणार आहोत असे शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार ते आता राज्याचा दौरा करणार आहेत.
Join Our WhatsApp Community