ड्रग्जमाफिया ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Lalit Patil) बंगळूरूमधून बेड्या ठोकल्या आहेत. 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. आज अखेर त्याला बंगळूरूमधून अटक केले असून ललितला मुंबईत आणले गेले. ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या वेळी ललित पाटील याने मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवले गेले. कुणाकुणाचा हात आहे सगळे सांगेन, असा दावा केला आहे. ललित पाटील याच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Lalit Patil)
ड्रग्स फ्री महाराष्ट्र संकल्पना असलेल्या परिषदेत सगळ्यांना सांगण्यात आले होते की, हा उपक्रम घ्या. त्यानंतर सगळे युनिट्स कामाला लागले आहेत. मुंबई पोलिसांना देखील नाशिकची माहिती मिळाली आणि धाड टाकली. यामध्ये ललित पाटील हातामध्ये आला आहे. आता मोठे नेक्सस बाहेर येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Lalit Patil)
(हेही वाचा – Devendra Fadanvis : अद्याप कुणीही काही मागितले नाही जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ – देवेंद्र फडणवीस)
एक मोठा नेक्सस आता समोर आला आहे. आता सगळ्या गोष्टी बाहेर येईल आणि बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होतील. सगळी चौकशी केली जाणार कोणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. निश्चितपणे एक मोठे ड्रग्जचे जाळे बाहेर येईल. काही गोष्टी ज्या मला आत्ता समजल्या आहेत. त्या मी लगेच माध्यमांना सांगू शकत नाही. मी योग्यवेळी सांगेन. पण एवढेच सांगतो की, या कारवाईतून आम्ही एक मोठे ड्रग्जचे जाळे उघड करू असे फडणवीस पुढे म्हणाले. कुणालाच सोडणार नाही, सर्व दोषींवर कारवाई ससून रुग्णालयावर गुन्हेगारांच्या मुदती वाढवून देण्यात आल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या आरोपांची चौकशी सुरू आहे. सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असाही इशारा फडणवीसांनी दिला.
पोलिसांच्या या कारवाईतून एक मोठे जाळे बाहेर येणार आहे. ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो यापेक्षा जे ड्रग्जचे जाळे बाहेर येणार आहे, त्यावरून अनेकांच्या अडचणीत वाढणार आहेत. (Lalit Patil)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community