सुजित महामुलकर
राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative council elections) विरोधी पक्षांकडून एकही उमेदवार दिला नाही, मात्र एका अपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो बाद होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अखेर पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल, हे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Legislative council elections)
‘हिंदुस्थान पोस्ट’ची बातमी
विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल, अशी बातमी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दोन दिवसांपूर्वीच केली होती. (Maharashtra Legislative council elections)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या पाच जागांमध्ये भाजपच्या तीन आणि शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अप) कॉँग्रेसची प्रत्येकी एक जागा आहे. भाजपने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केणेकर आणि माजी आमदार दादाराव केचे यांना संधी दिली आहे. तर, शिवसेनेने नंदूरबारच्या चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचे निकटवर्तिय संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Maharashtra Legislative council elections)
निवडणूक का लागली?
शिवसेनेचे आमशा पाडवी (शिवसेना), राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि भाजपाचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या. त्या जागांसाठी २७ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे. मंगळवारी १८ मार्च रोजी अर्जाची छाननी होईल. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. (Maharashtra Legislative council elections)
अर्ज बाद होणार?
विरोधी महाविकास आघाडीकडे एकही आमदार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांनी एकही उमेदवार दिलेला नाही. मात्र सोमवार, दि. १७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. उमेश म्हेत्रे यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक आमदार नसल्याने त्यांचा अर्ज मंगळवारी छाननीत बाद होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Legislative council elections)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community