आदित्य ठाकरेंच्या मंगळवारी झालेल्या औरंगाबादच्या महालगावातील कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. यावेळी आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचे आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले असून ही दगडफेक शिंदे गटाकडून केल्याचे आरोप ठाकरे गटाचे नेते करत आहेत. पण आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली नाही, असा खुलासा पोलीस अधिकारी सुनिल लांजेवार यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तावाहिनी बोलताना पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी सांगितले की, आदित्य ठाकरेंच्या मंगळवारच्या महालगावातील सभेमध्ये दगडफेक करण्यात आली असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. तथापि, आदित्य ठाकरेंची सभा झाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या ताफ्यासोबत जात असताना त्यांची गाडी पुढे निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडी किरकोळी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये एका माध्यमाच्या प्रतिनिधीला किरकोळ जखम झाली होती. यात कुठल्याही प्रकारची दगडफेक किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही. https://www.youtube.com/watch?v=62pjCMGjbmY&ab_channel=HindusthanPost पुढे लांजेवार म्हणाले की, प्रसार माध्यमातून समजले की, विरोधी पक्षनेत्यांनी याबाबत पत्र दिले आहे आणि दगडफेक झाल्याचे सांगितले आहे. परंतु तसा काही प्रकार घडल्याचे निर्देशास आलेले नाही. तथापि विरोधी पक्षनेत्यांनी असे काही पत्र दिले असेल तर त्याअनुषंगाने निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात येईल. (हेही वाचा – औरंगाबादमधील गोंधळानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, शिवसंवाद यात्रेला अतिरिक्त पोलीस राहणार तैनात
Join Our WhatsApp Community