एकाही राजकीय पक्षाची EVM Machine Hack बाबत लेखी तक्रार नाही

राजकीय पक्षांवर काय कारवाई करणार असे विचारले असता श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले, “राजकीय पक्ष दावा नाही करत, तर त्यांचे मत व्यक्त करतात. मात्र समाजमाध्यमांवर तांत्रिक खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध सखोल चौकशी करून कारवाई केली जाते.”

358
एकाही राजकीय पक्षाची EVM Machine Hack बाबत लेखी तक्रार नाही
  • सुजित महामुलकर

विरोधी पक्षांकडून (Opposition Parties) विशेषतः काँग्रेसकडून (Congress), इव्हीएम मशीन (EVM Machine) हॅक (Hack) करून भाजप (BJP) सगळ्या निवडणुका जिंकते असा आरोप करण्यात येतो, मात्र निवडणूक कार्यालयाकडे अद्याप एकाही राजकीय पक्षाने इव्हीएम मशीन हॅकबाबत लेखी तक्रार किंवा आक्षेप घेतला नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Election Officer) श्रीकांत देशपांडे (Deshpande) यांनी आज बुधवारी (०७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केला. (EVM Machine Hack)

राजकीय पक्ष मत व्यक्त करतात

देशपांडे यांनी पुढे स्पष्ट केले की इव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकत नाही आणि जे असा दावा करतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येते. मग राजकीय पक्षांवर काय कारवाई करणार असे विचारले असता त्यांनी सांगितले, “राजकीय पक्ष दावा नाही करत, तर त्यांचे मत व्यक्त करतात. मात्र समाजमाध्यमांवर तांत्रिक खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध सखोल चौकशी करून कारवाई केली जाते.” (EVM Machine Hack)

(हेही वाचा – Sharad Pawar : देशाच्या विकासात सर्व पंतप्रधानांचे योगदान)

का हॅक होऊ शकत नाही?

इव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही, याची काही कारणे देशपांडे यांनी दिली. “इव्हीएम मशीन ही एक स्टँड अलोन (Stand Alone) मशीन आहे. म्हणजे त्या मशिनला कशाशीही संपर्क होऊ शकत नाही जसे, रेडियो लहरी, सॅटेलाइट कुठल्याही लहरीच्या संपर्कात येऊ शकत नाही, त्यात अनधिकृतपणे कुणीही छेडघाड करण्याचा (Unauthorised Access Detection Module) प्रयत्न केला तर ते मशीन पूर्णपणे बंद होते, त्याची कंट्रोल चिप (Control Chip) आहे ती एकदाच कोडिंग (Coding) केलेली असते आणि त्यात बदल करायचा असेल तर कोड बदल करावा लागतो या सुरक्षाविषयक तांत्रिक बाबी (Technical Aspects) आहेत,” अशी माहिती देशपांडे यांनी दिली. (EVM Machine Hack)

प्रशासकीय पातळीवरही सुरक्षा उपाय

त्याचप्रमाणे, प्रशासकीय पातळीवरही सुरक्षा उपाय केले जातात जसे की मशिनची वाहतूक (Transportation), कोणते मशीन कोणत्या बूथवर जाणार तेही आधी माहीत नसते, तर कोणते बटन कोणत्या उमेदवारांसाठी आहे तेदेखील शेवटच्या क्षणाला उघड केले जाते, त्याची वाहतूक करताना सशस्त्र पोलिस (Armed Police) असल्याशिवाय करत नाही अशा अनेक सुरक्षा उपायांमधून या मशीन जातात त्यामुळे हॅक होणे शक्य नाही, तसेच सर्व राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटकडून मशीन योग्य प्रकारे सुरू आहे की नाही याची खात्री केली जाते, असा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. (EVM Machine Hack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.