दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण मद्य धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. (Arvind Kejriwal)
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (एप्रिल) सुनावणी करू. केजरीवाल यांच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी तर ईडीच्यावतीने सॉलिसिटर जनरल यांनी युक्तिवाद केला. सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘मला तुमच्यासमोर काही धक्कादायक तथ्ये मांडायची आहेत.’ त्यावर कोर्ट म्हणाले की, नोटीस बजावू द्या. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – Iran-Israel Tension : इस्रायल-इराण संघर्षामुळे भारतातील विमान प्रवास महागणार)
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी करू – कोर्ट
सिंघवी म्हणाले- या शुक्रवारी शक्य असल्यास सुनावणीची तारीख जवळ ठेवा. त्यावर कोर्ट म्हणाले- आम्ही तुम्हाला जवळची तारीख देऊ शकतो, पण तुम्ही सुचवलेली तारीख नाही. केजरीवाल (Arvind Kejriwal) प्रचार करू शकत नाहीत म्हणून ही अटक केल्याचे सिंघवी म्हणाले. कोर्ट म्हणाले- आम्ही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी करू. (Arvind Kejriwal)
मद्य धोरण प्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. २२ मार्च रोजी त्यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीवर पाठवले होते, जी नंतर १ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. १ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार कारागृहात पाठवले होते. केजरीवाल यांना बॅरेक क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले आहे. (Arvind Kejriwal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community