राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणा-या मतदानाला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार विधान भवनात सर्व पक्षांचे आमदार आपलं मतदान नोंदवत आहेत. पण या मतदानावेळी थोडासा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. शिवसेना आमदार मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नसल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे थोडासा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.
शिक्का नसलेली मतपत्रिका
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिक्का मारण्यात आलेला नव्हता. नियमानुसार प्रत्येक मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का असणं आवश्यक असतं, तरच ती मतपत्रिका ग्राह्य धरली जाते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेवर शिक्का नसल्याचे लक्षात येताच त्यांना दुसरी योग्य ती मतपत्रिका देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या पहिल्या मतपत्रिकेवर आयोगाचा शिक्का का नव्हता, याची आता निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आसल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः मविआच्या दोन मतांवर भाजपचा आक्षेप, निवडणूक आयोगाचे म्हणणे काय?)
भाजपचा आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीनुसार प्रत्येक मतदार आमदाराने आपल्या पक्षाच्या अधिकृत एजंटला एका ठराविक अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते. पण जितेंद्र आव्हाड आणि आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या पक्षाच्या एजंटच्या हातात मतपत्रिका घेतल्यामुळे भाजपकडून या दोघांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पण हे मतदान ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community