काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही – केंद्रीय मंत्री Amit Shah

111
काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही - केंद्रीय मंत्री Amit Shah
काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही - केंद्रीय मंत्री Amit Shah

गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी शनिवारी जम्मूतील पलौरा येथे जाहीर सभा घेतली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात शाह यांची ही पहिलीच सभा होती. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीवर खोऱ्यात पुन्हा दहशत पसरवल्याचा आरोप केला. (Amit Shah)

शाह म्हणाले- काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीला LOC (भारत-पाकिस्तान सीमेवर) व्यापार पुन्हा सुरू करायचा आहे. त्याचा पैसा दहशतवाद्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचेल आणि परिसरात पुन्हा अशांतता निर्माण होईल. मात्र, भाजपा सरकार (BJP Gov) असताना हे शक्य होणार नाही. तसेच मी आज सांगू इच्छितो की जोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. काँग्रेसला तुरुंगात डांबलेल्या दगडफेक आणि दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांना मुक्त करायचे आहे, जेणेकरून पुन्हा दहशतवाद पसरेल. असा त्यामागचा उद्देश आहे.  

अमित शहांच्या भाषणातील ठळक मुद्दे… 

शाह म्हणाले- राज्याचा दर्जा मिळवून देण्यावरून राहुलबाबा मूर्ख बनवत आहेत

शाह पुढे म्हणाले- नॅशनल कॉन्फरन्स पार्टी आणि काँग्रेस म्हणतात की आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ. मला अब्दुल्ला साहेब आणि राहुल बाबा यांना विचारायचे आहे की, तुम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कसा परत देणार? तुम्ही जनतेला मूर्ख बनवत आहात कारण केवळ भारत सरकारच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ शकते.

आम्ही जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणार नाही

अमित शाह पुढे म्हणाले, नॅशनल कॉन्फरन्स पार्टी, काँग्रेस आणि पीडीपीचे लोक म्हणतात, आम्ही पूर्वीसारखी व्यवस्था आणू. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? स्वायत्ततेच्या चर्चेने जम्मू-काश्मीर पेटले, खोऱ्यात 40 हजार लोक मारले गेले. ते म्हणतात, आम्ही जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देऊ. मी आज म्हणतो, कोणतीही शक्ती स्वायत्ततेबद्दल बोलू शकत नाही.

(हेही वाचा –Tuhin Kant Pandey: भारताच्या अर्थ सचिव पदी ‘या’ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती )

आता जनता ठरवेल कोणाचे सरकार बनवायचे

नॅशनल कॉन्फरन्स (National Conference Party) सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. मी अगदी लहानपणापासून निवडणुकीची आकडेवारी शिकत आलो आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि फारुख अब्दुल्ला यांचे सरकार कधीच स्थापन होऊ शकत नाही. भाजपा पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवेल आणि जिंकेल हे मला ठाम सांगायचे आहे. कोणाचे सरकार बनवायचे हे दुसरे कोणी ठरवायचे ते दिवस आता गेले, आता जम्मू-काश्मीरमधील जनता ठरवेल कोणाचे सरकार बनवायचे. Amit Shah

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत, त्यापैकी 47 खोऱ्यात आणि 43 जम्मू विभागात आहेत. राज्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.