Pankaja Munde : सारंगी महाजन यांच्या आरोपांत तथ्य नाही; गोविंद मुंडे यांनी दिले स्पष्टीकरण

99
Pankaja Munde : सारंगी महाजन यांच्या आरोपांत तथ्य नाही; गोविंद मुंडे यांनी दिले स्पष्टीकरण
Pankaja Munde : सारंगी महाजन यांच्या आरोपांत तथ्य नाही; गोविंद मुंडे यांनी दिले स्पष्टीकरण

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोघांच्या माध्यमातून जबरदस्तीने जमीन नावावर करून घेतल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे या दोघांचाही संबंध नसल्याचे देखील मध्यस्थी गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. सारंगी महाजन या नात्याने मुंडे बंधू-भगिनींच्या मामी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून जबरदस्तीने गोविंद मुंडे यांच्या माध्यमातून जमीन लिहून घेतल्याचा आरोप त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर केला होता, त्यावर गोविंद मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच निवडणुकांच्या तोंडावर मुंडे बंधू-भगिनींना बदनाम करण्याचा हा डाव आहे, ठरल्यानुसारच व्यवहार झाला होता, सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांना त्या व्यवहाराचे पैसेही मिळाले होते, असेही मध्यस्थी गोविंद मुंडे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Jammu and Kashmir: किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला, २ रक्षक हुतात्मा; काश्मीर टायगर्सने स्वीकारली जबाबदारी)

बीड जिल्ह्यातील नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर ऐन निवडणुकीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे (Pankaja munde) यांच्यावर गंभीर आरोप केले.

प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड (Beed) जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जबरदस्तीने घेतली असल्याचे आरोप सारंगी महाजन यांनी केले आहेत. परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करून विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करून घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी (Parli) सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.

मात्र सारंगी महाजन यांनी ज्यांचा संदर्भ देत हे आरोप केले, त्या गोविंद मुंडेंनी हा व्यवहार महाजन कुटुंबियांच्या संमतीनेच झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.