लस नाही, पगार नाही! पिंपरी-चिंचवड महापालिकेचा फतवा

आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना यासाठी २० जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात असून, प्रत्येकाने लस घ्यावी यासाठी राज्य तसंच जिल्हा स्तरावर प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सरकारी कर्मचाऱ्यांनीही अद्याप लस घेतलेली नाही. मात्र, अशा सरकारी कर्मचाऱ्यांना आता लस घेतली नाही, तर पगार मिळणार नाही, असा आदेशच पालिका आयुक्तांनी काढला आहे. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना यासाठी २० जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

इतके कर्मचारी करतात काम

सर्वसामान्यांनी लस घ्यावी अशी जनजागृती प्रशासन करत असताना, पालिकेचा कर्मचारी लस अभावी मागे राहू नये म्हणून वेतन स्थगित करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण 7 हजार 479 कर्मचारी कार्यरत आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदारपद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(हेही वाचाः यंदाच्या गणेशोत्सवासाठी सरकारने गणेशमूर्तीची उंची किती ठरवली? वाचा…)

नागरिकांना करावी लागते प्रतीक्षा

या कर्मचा-यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही लस घेतलेली नाही. अशा कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी सूचित केलं आहे. त्यामुळे आता लसीकरणाला चांगला वेग मिळणार आहे. दुसरीकडे सामान्य नागरिक देखील लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र १८-४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here