नूह हिंसाचारावरून राजकारण तापले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये आम आदमी पार्टीचे (आप) राज्य संयोजक अहमद जावेद यांचे नवीन नाव समोर आले आहे.
वृत्तानुसार, हरियाणातील आप नेते अहमद जावेद यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी अहमद जावेदविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर मध्ये असे म्हटले आहे की, आप नेते अहमद जावेद यांनी 31 जुलै रोजी सोहना येथील निरंकारी चौकात बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांना मारण्यासाठी जमावाला भडकवले होते. ‘आप’ नेत्याविरोधात 2 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा Amrut Bharat station scheme : महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट?)
Join Our WhatsApp Community