पंजाबचे सभापती कुलतार सिंग रंधावा, कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग मीत हेयर आणि लालजीत सिंग भुल्लर यांच्या विरोधात तरणतारण येथील कोर्टाने अजामीनपात्र वॉरेट जारी केले आहे. न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ऑगस्ट 2020 मध्ये अमृतसर आणि तरणतारण या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खटल्याच्या संदर्भात न्यायालयात हजर राहण्यात ते अयशस्वी ठरले होते. या नेत्यांना गेल्या 2 वर्षांत अनेकदा न्यायालयात बोलावूनही ते न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे तरणतारणचे मुख्य न्यायदंडाधिकारी बागीचा सिंह यांच्या न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. या नेत्यांनी 20 ऑगस्ट 2020 रोजी स्थानिक जिल्हा प्रशासकीय संकुलासमोर धरणे आंदोलन केले होते. पंजाबमधील तरणतारण, अमृतसर, गुरुदासपूर आणि बटाला जिल्ह्यांमध्ये बनावट दारू प्यायल्याने सुमारे 111 लोकांचा मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पटियाला, बर्नाला, पठाणकोट आणि मोगासह काही ठिकाणी पंजाब सरकारविरोधात निदर्शने केली. सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ‘आप’ने उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून बनावट दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्याची मागणीही केली होती.
( हेही वाचा: ब्रिटिशांचा रोष पत्करुन बसवण्यात आलेल्या चांदीच्या गणपतीचा इतिहास माहितीय का? )
Join Our WhatsApp Community