नाशिकमधील अहस्तांतरित सदनिका, भूखंडाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी!

167

नाशिकमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, विकासकांनी ७ हजार सदनिका आणि २०० भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित केलेले नाहीत, याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडताना केली आहे.

तर आयुक्तांना तिथून हलवा

विकासकांनी ज्या सदनिका आणि भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित केले नाहीत त्यावर तपास करून दोषी अधिकारी आणि विकासकांवर कारवाई केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे. तसेच मनपा आयुक्तांना तिथून हलवावे, असे निर्देशही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

( हेही वाचा: आमदारांना ‘या’ गुन्ह्याची वाटतेय भीती! सरकारवर आणला दबाव )

म्हणून गरिबांसाठी घरं उपलब्ध झाली नाहीत

दरेकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत भूमी अभिन्यास आणि इमारत नकाशे विकसित करताना, द्यायचे २० टक्के भूखंड आणि सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गट प्रवर्गासाठी उपलब्ध करून देणं बंधनकारक असताना, ही घरे आणि भूखंड विकासकांनी म्हाडाला हस्तांतरित केले नाहीत, त्यामुळे गरीबांसाठी अपेक्षित घरं उपलब्ध झाली नाहीत. याबाबत एक बैठक घेऊन चौकशी समिती निश्चित केली जाईल असे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.