North Central LS Constituency : अ‍ॅड. शेलार यांच्या सहाय्याने अ‍ॅड. उज्ज्वल निकम केस जिंकणार?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शेवटच्या तारखेपर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार निश्चित करताना अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपाला तारेवरची कसरत करावी लागली आहे.

133
North Central LS Constituency : अ‍ॅड. शेलार यांच्या सहाय्याने अ‍ॅड. उज्ज्वल निकम केस जिंकणार?
  • सचिन धानजी,मुंबई

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शेवटच्या तारखेपर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार निश्चित करताना अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपाला तारेवरची कसरत करावी लागली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक ते दोन दिवस आधीच या मतदार संघातून भाजपाकडे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली आहे. विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कापून भाजपाने निकम यांना उमेदवार दिली असली तरी राजकारणात प्रथमच प्रवेश करणाऱ्या निकम यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागत आहे. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील काँग्रेसची सर्व ताकद आपल्या प्रचारात वापरत आहेत. त्यामुळे काँग्रेसला केवळ हाताचा प्रचार करून बांधणी करायची आहे, तर भाजपाला विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. (North Central LS Constituency)

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून सध्या भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यातच प्रमुख लढत आहे. वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी मिळवण्यासाठी नाराजीचे नाट्य रचले. ज्यात त्यांना यश आले. या मतदार संघातून नसीम खान यांना उमेदवारी मिळवणे अपेक्षित होते, परंतु उबाठा शिवसेनेने त्यांचा प्रचार करण्यात अडचणी येणार असल्याचे सांगत वर्षा गायवाकड यांची शिफारस केल्याने त्यांना सोडून या मतदार संघातून निवडणूक लढवावी लागत आहे. एकनाथ गायकवाड हे सन २००४मध्ये या मतदार संघाचे खासदार होते. त्यामुळे याचा फायदा आपल्या होईल असा अंदाज गायकवाड यांना आहे. पण प्रत्यक्षात पूर्वीचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ आता राहिलेला नाही, त्याचेही विभाजन होऊन त्यातील काही मतदार संघ दक्षिण मध्य मुंबईत आले आहे. (North Central LS Constituency)

(हेही वाचा – धारावीतील रॅपर्सकडून Rahul Shewale यांना अनोखी भेट; राहुल शेवाळे जैसा है कौन? गाण्याने घातला धुमाकूळ)

तर भाजपाने या मतदार संघात आधी चित्रपट अभिनेत्री माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर यांची नावे चालवून बघितली. परंतु त्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा असतानाही पक्षाने निवृत्त सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, भाजपाने या मतदार संघातील उमेदवाराबाबत २६ नोव्हेंबर च्या दहशतवादी हल्ल्याला उजळणी देत या कारवाईबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे भाजपाला चांगला प्रचाराचा मुद्दा मिळाला आहे. मात्र, या मतदार संघाची पूर्ण जबाबदारी ही आशिष शेलार यांच्याकडे असल्याने शेलार हे मुंबईसह इतर मतदार संघा लक्ष देताना दिसत नाही. याच मतदार संघात ठाम मांडून बसले असून निकम यांचा पराभव किंवा कमी मिळणारी मते ही शेलारांसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थिती करणाऱ्या ठरणार आहेत. (North Central LS Constituency)

या मतदार संघातील विलेपार्ले, वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात भाजपा, चांदिवली, कुर्ला विधानसभा क्षेत्रात शिवसेना, कालिनात उबाठा शिवसेनेचे आमदार आहेत आणि वांद्रे पूर्व येथील क्षेत्रात काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांचा कल महायुतीच्या बाजुने आहे, त्यामुळे उबाठा शिवसेना वर्षा गायवाकड यांच्या पाठिशी पूर्ण पणे राहिलेली असली तरी मतदार संघातील आकडेवारीत निकम यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. याच मतदार संघातील उबाठा शिवसैनिकांना प्रथमच काँग्रेसच्या पंजाला मतदान करावे लागणार आहे. मागील दोन निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार असल्याने शिवसैनिकांना कमळ चिन्हावर मतदान करण्याची सवय असली तरी यंदा पंजावर मतदान करताना निश्चितच त्याचा परिणाम वेगळा झाल्याचे पहायला मिळेल असे बोलले जात आहे. (North Central LS Constituency)

(हेही वाचा – North Mumbai LS Constituency : काँग्रेससाठी यंदाही नसेल भूषणावह विजय)

या मतदार संघात एकूण १७ लाख २१ हजार २५० मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ९ लाख २९ हजार ८०३ तर महिला मतदारांची संख्या ७ लाख ३१ हजार ३८३ एवढी आहे. या मतदार संघात ५ लाखांहून अधिक मराठी मतदार आहे. म्हणजे ३४ टक्के मराठी मतदार त्याखालोखाल २४ टक्के म्हणजेच ४ लाखांहून अधिक मुस्लिम मतदार आहे. त्यानंतर उत्तर भारतीयांची संख्या आहे पावणे तीन लाख, ज्याची टक्केवारी १५ टक्क्यांच्या आसपा आहे. तर दक्षिण भारतीय मतदारांची टक्केवारी १० टक्के आणि ख्रिश्चन व इतर समाज मिळून ७ टक्के अशाप्रकारे मतदार आहेत. (North Central LS Constituency)

त्यामुळे मतदारांची ही टक्केवारी पाहता २४ टक्के मुस्लिम मतदार आणि ख्रिश्चनसह इतर समाज मिळून ७ अशाप्रकारे ३१ टक्के समाज हा भाजपा विरोधी मतदार असून त्याचा फायदा गायकवाड घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपाचे आशिष शेलार यांनीची याची सुत्रे हाती घेतल्याने कोणतीही संधी ते काँग्रेसला आणि त्यांच्या महाविकास आघाडीला देणार नाही. मात्र, एकाबाजुला राजकीय पार्श्वभूमी तथा वारसा लाभलेल्या गायकवाड आणि दुसरीकडे कायदेतज्ज्ञ असलेले उज्ज्वल निकम. त्यामुळे न्यायालयात बाजू मांडून आपली केस जिंकणारे आता निकम आता जनतेच्या न्यायालयात किती मतांनी निवडून येतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे. (North Central LS Constituency)

(हेही वाचा – Arvind Kejriwal कारागृहाबाहेर आल्याने काँग्रेस नुकसान होणार की भाजपाचे; काय म्हणाले प्रशांत किशोर?)

या भागातील प्रमुख समस्या

या भागांमध्ये कुर्ला, चांदिवली, वांद्रे पूर्व, कलिना या भागांमधील एसआरएच्या योजना योजना, तसेच विलेपार्ले आणि कुर्ला भागातील फनेल एरियातील पुनर्विकासावर आलेली बंधने, म्हाडा वसाहतींसह जुन्या इमारतींचा पुनर्विकास, रस्ते वाहतूक कोंडी, मेट्रोची सुरु असलेली कामे, फेरीवाल्यांच्या समस्या मोठ्याप्रमाणात आहे, पाईपलाईन लगतच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन आदीही समस्या आहे. (North Central LS Constituency)

लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले खासदार

सन २००४ : एकनाथ गायकवाड, काँग्रेस.

सन २००९ : प्रिया दत्त, काँग्रेस.

सन २०१४ : पुनम महाजन, भाजपा.

सन २०१९ : पुनम महाजन, भाजपा. (North Central LS Constituency)

विधानसभा निहाय निवडून आलेले आमदार

विलेपार्ले : पराग अळवणी, भाजपा.

चांदिवली : दिलीप लांडे, शिवसेना.

कुर्ला : मंगेश कुडाळकर, शिवसेना.

कलिना : संजय पोतनीस, उबाठा शिवसेना.

वांद्रे पूर्व : झिशान सिद्दीकी, काँग्रेस. (आता राष्ट्रवादी काँग्रेस)

वांद्रे पश्चिम : अ‍ॅड. आशिष शेलार, भाजपा. (North Central LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.