North Central Mumbai Lok Sabha 2024 : वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून अ‍ॅड. उज्ज्वल निकम तसेच काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यासह एकूण ४५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १२ अर्ज नाकारण्यात आले आहे.

400
North Central Mumbai Lok Sabha 2024 : वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद

उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात भाजपाचे अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या प्रा. वर्षा गायकवाड यांच्यात प्रमुख लढत असून या मतदार संघातून उमेदवारी भरलेल्या वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला गेला आहे. अर्थात हा अर्ज कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा नसून या मतदार संघातून वर्षा गायकवाड नावाच्या दोन महिला उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, या दोन्ही वर्षा गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोरील समस्या आता दूर झाली आहे. (North Central Mumbai Lok Sabha 2024)

(हेही वाचा – North East Mumbai LS Constituency : ईशान्य मुंबईत पाच उमेदवार संजय पाटील)

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून (North Central Mumbai Lok Sabha 2024) अ‍ॅड. उज्ज्वल निकम तसेच काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यासह एकूण ४५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १२ अर्ज नाकारण्यात आले आहे. तर २८ अर्ज हे पात्र ठरले आहे. यामध्ये वर्षा गायकवाड नावाने दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या धारावीतून आयात करून बाजुच्या मतदार संघात महाविकास आघाडीने उतरवल्या असल्या तरी अपक्ष उमेदवार वर्षा भगवान गायकवाड या चक्क जालन्यातील मंठा तालुक्यातील असून टाकळखोपांमध्ये राहणाऱ्या या वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर वर्षा महादेव गायकवाड याही जालना जिल्हयातील मंठा तालुक्यातील ताळणी गावातील आहेत. मात्र, या दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अर्जांचे प्रतिज्ञापत्रक एकाच वकीलाकडून नोटरी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. (North Central Mumbai Lok Sabha 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.