Piyush Goyal : केंद्रीय मंत्री पीयूष गोयलांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमले उत्तर भारतीय बांधव

'मोदीजींची हमी म्हणजे हमी पूर्ततेची हमी' असे सांगताना पियुष गोयल म्हणाले की, वीज, शौचालये, पिण्याचे पाणी, उज्ज्वला गॅसने प्रत्येक गावातील माता-भगिनींना साधी, सोयीस्कर जीवनशैली आणि प्रतिष्ठा कशी मिळवून‌ दिली हे सांगितले.

270
Piyush Goyal : केंद्रीय मंत्री पीयूष गोयलांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमले उत्तर भारतीय बांधव

उत्तर मुंबईला सर्वोत्तम मुंबई बनवण्याचे व्रत घेतलेल्या भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी पायाला भिंगरी लावून प्रचारामध्ये आघाडी मिळवली आहे. रविवारी प्रचारानिमित्त पीयूष गोयल कांदिवली (पू) येथे उत्तर भारतीय संमेलनामध्ये सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित उत्तर भारतीय समाज बांधवांशी संवाद साधला. ‘ज्यांनी प्रभू श्रीराम आणले त्यांना आम्ही परत आणू’, अशा घोषणा देण्यात आल्या. (Piyush Goyal)

माजी आमदार रमेशसिंह ठाकूर यांनी आयोजित केलेल्या या विशाल जाहीर सभेत मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उत्तर भारतीय समाजाचे भाजपाप्रती असलेले विशेष प्रेम ही आमची खरी संपत्ती आहे अशी उपमा दिली. विकसित भारताचा संकल्प साकारण्यासाठी संपूर्ण उत्तर भारतीय समाजाने २० मे रोजी भाजपा महायुतीचे उमेदवार असलेल्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन शेलार यांनी आपल्या निवेदनात केले. (Piyush Goyal)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार Srirang Barne यांचा अर्ज दाखल)

‘मोदीजींची हमी म्हणजे हमी पूर्ततेची हमी’ असे सांगताना पियुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, वीज, शौचालये, पिण्याचे पाणी, उज्ज्वला गॅसने प्रत्येक गावातील माता-भगिनींना साधी, सोयीस्कर जीवनशैली आणि प्रतिष्ठा कशी मिळवून‌ दिली हे सांगितले. गोयल यांनी उत्तर भारतीय स्नेहसंमेलनाला उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाचे हे प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. (Piyush Goyal)

भाजप नेते कृपाशंकर सिंह, माजी आमदार रमेशसिंह ठाकूर इत्यादी अनेक दिग्गज नेत्यांनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली.‌ कांदिवली (पू) ठाकूर गावात आयोजित उत्तर भारतीय स्नेहसंमेलनात माजी आमदार रमेशसिंह ठाकूर, शिवसेनेचे (शिंदे गट) आ.प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह, सागरसिंह ठाकूर, कमलेश राय, उद्योजक व्ही.के.सिंह ठाकूर, मुंबई सचिव राणी द्विवेदी, जयप्रकाश सिंग आदी भाजपचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. (Piyush Goyal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.