North Mumbai Constituency : शिवसेनेची मोर्चेबांधणी जोरात सुरु, काँग्रेसमध्ये निरुत्साह,

उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा वेग वाढला

275
North Mumbai Constituency : शिवसेनेची मोर्चेबांधणी जोरात सुरु, काँग्रेसमध्ये निरुत्साह,
North Mumbai Constituency : शिवसेनेची मोर्चेबांधणी जोरात सुरु, काँग्रेसमध्ये निरुत्साह,
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ (North Mumbai Constituency) हा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दुसरीकडे या मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाला या मतदार संघातून उमेदवार सापडत नसल्याने शिवसेना उबाठा पक्षाने या मतदार संघावर आपले लक्ष केंद्रीत करून त्यावर आपला डाव साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदार संघात प्रत्येक शिवसैनिकांना सज्ज राहण्याच्या सूचना करत निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना केल्या जात आहे.

मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता तरीही…

शिवसेना उबाठा पक्ष आणि काँग्रेस तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्यावतीने लढत आहेत. मुंबईतील सहा लोकसभात मतदार संघांपैंकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात (North Mumbai Constituency) शिवसेना उबाठा पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – सांगलीत Sharad Pawar यांची शिवसेना उबाठाच्या खांद्यावर बंदूक?)

मालाडमध्ये मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाने चारही मतदार संघात उमेदवार जाहीर केल्यानंतरही उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून माजी विभाग प्रमुख व शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्यासह तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेकडे घेऊन विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यासाठी मालाडपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहे. दोन दिवसांपूर्वी मालाडमधील काचपाडा येथील कपोल हॉलमध्ये या संपूर्ण मतदार संघातील विभाग क्रमांक १ आणि विभाग क्रमांक २चा शिवसेना उबाठा पक्षाचा मेळावा पार पडला.

WhatsApp Image 2024 03 30 at 6.35.02 PM

पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्याने मैदान मोकळे

हा मेळावा दहिसर, बोरीवलीमध्ये न घेता शिवसेना उबाठा पक्षाने काँग्रेसचा आमदार असलेल्या मालाडमधील कपोल हॉलमध्ये घेतला. त्यामध्ये या पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्यासह विलास पोतनीस,विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या मेळाव्याला उदेश पाटेकर आणि अजित भंडारी हे दोन्ही विभागप्रमुखांसह उपनेत्या संजना घाडी तसेच पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना करत उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी दिलेल्या पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्याने मैदान आपलेच आहे,असे सांगितले. त्यामुळे एकप्रकारे घोसाळकर यांनी आता आपल्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून पक्षाचा प्रचार करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.