मुंबईतील उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून आता विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करण्यास सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. उत्तर मुंबईतील महायुतीच्यावतीने भाजपाचे उमेदवार पियुष गोयल आणि ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेच्या यांच्याकडून स्थानिक मुद्द्यांना हात घालत भविष्यात जनतेला हे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एका बाजुला महाविकास आघाडीचे उमेदवार हिंदु मुस्लिमांच्या नावे धर्माचे राजकारण केले जात असताना दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे रेटतानाच स्थानिक प्रश्नांवरही विशेष लक्ष भाजपाचे उमेदवार केंद्रीत करताना दिसत आहेत. (North Mumbai, North East Mumbai Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Monkey : गुहागर तालुक्यात माकडांचा उच्छाद; पाभरे गावातील घर, फळबागांचे नुकसान)
कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करणार?
उत्तर मुंबईत भाजपाचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भुषण पाटील यांच्या लढत असून ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. ईशान्य मुंबईतील भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जुन्या तीन मूर्ती मंदिरासाठी रोपवे (केबल कार) बांधण्यात येणार असून त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक पर्यटन केंद्र विकसित केले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आज विक्रोळी भांडुपमध्ये मराठी सांस्कृतिक केंद्र उभारणार, मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस, आणि कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करणार असल्याचेही आश्वासन दिले. तसेच ठाण्यातील हरिओम नगरमधील जनतेला टोल माफी दिली जाणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे कोटेचा हे प्रचारात स्थानिक मुद्दयांना हात घालत असल्याने मतदारांना ते प्रेरित करताना दिसत आहेत. (North Mumbai, North East Mumbai Lok Sabha Election 2024)
मुस्लिम समाजासह इतरांचे ब्रेन वॉश
एकाबाजुला कोटेचा हे स्थानिक प्रश्न हाताळून ते मार्गी लावण्याचे आश्वासन देत मतांची शिदोरी बांधण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील हे मुस्लिम वस्त्यांमध्ये फिरुन आपण भाजपाला मतदान न करण्याचे आणि आपल्याला मतदान म्हणजे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किती महत्वपूर्ण आहे याबाबत मुस्लिम समाजासह इतरांचे ब्रेन वॉश करताना दिसत आहेत. (North Mumbai, North East Mumbai Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community