North West Lok Sabha Constituency : शिवसेनेच्याच ताब्यात राहणार, किर्तीकरांशिवाय नाही पर्याय

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर आणि रामदार कदम यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने हा मतदार संघ भाजपच्या दावणीला बांधला जाईल असे शिवसेना उबाठा गटाकडून पतंग उडवले जात आहे.

222
North West Lok Sabha Constituency : शिवसेनेच्याच ताब्यात राहणार, किर्तीकरांशिवाय नाही पर्याय
North West Lok Sabha Constituency : शिवसेनेच्याच ताब्यात राहणार, किर्तीकरांशिवाय नाही पर्याय

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने हा मतदार संघ भाजपच्या दावणीला बांधला जाईल असे शिवसेना उबाठा गटाकडून पतंग उडवले जात आहे. परंतु मुंबईमध्ये शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन खासदार असून शिवसेनेच्या वाट्याला तीन पैकी दोन जागा आगामी लोकसभा निवडणुकीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्यातील दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ जर भाजपला सोडल्यास शिवसेनेच्या वाट्याला उत्तर पश्चिम अणि दक्षिण मध्य मुंबई हे दोन मतदार संघ येणार आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम मतदार संघासाठी गजानन किर्तीकर यांच्यापेक्षा कोणताही सरस उमेदवार नसल्याने किर्तीकर यांनाच पक्षाला रणांगणात उतरावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (North West Lok Sabha Constituency)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात सन २०१४ आणि २०१९मध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून गजानन किर्तीकर हे खासदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी या मतदार संघातून काँग्रेसचे गुरुदास कामत हे निवडून यायचे. परंतु आता शिवसेनेची दोन छकले झाल्यानंतर गजानन किर्तीकर हे शिवसेनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाच्यावतीने गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जर शिवसेनेने या मतदार संघातून गजानन किर्तीकर यांना उमेदवारी दिल्यास पिता पुत्रांमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या मतदार संघातून गजानन किर्तीकर यांच्याऐवजी रामदास कदम यांनी आपल्या मुलाला उभे करण्याची इच्छा प्रकट केली आणि या मतदार संघावरून कदम आणि किर्तीकर यांच्यामध्ये खंडाजंगी उडाली. अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या दोघांमधील वाद क्षमला आणि कदम यांनी किर्तीकर हे खासदार असून त्यांचीच दावेदारी असल्याचे सांगत यावर पडदा पाडला. (North West Lok Sabha Constituency)

या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात तीन आमदार भाजप पक्षाचे आणि तीन आमदार हे शिवसेना पक्षाचे आहेत. जोगेश्वरी, अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे अनुक्रमे रविंद्र वायकर, ऋतुजा लटके आणि सुनील प्रभू तर अंधेरी पश्चिम, वर्सोवा आणि गोरेगाव या विधानसभा मतदार संघात अमित साटम, भारती लव्हेकर आणि विद्या ठाकूर हे भाजपचे आमदार आहे. त्यामुळे या लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षाचे समसमान आमदारांची संख्या असल्याने शिवसेनेच्या ताब्यातील ही जागा आपल्याकडे घेऊन भाजप त्याठिकाणी आपला उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी उत्तर पश्चिम मतदार संघ हा भाजपकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले. (North West Lok Sabha Constituency)

सध्या संपूर्ण मुंबईमध्ये ईशान्य मुंबई, उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई हे मतदार संघ भाजपकडे असून त्यांच्या पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदार संघ हे शिवसेनेचे असून त्यांच्या पक्षाचे खासदार निवडून आले आहे. त्यातील उत्तर पश्चिमचे खासदार गजानन किर्तीकर व दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे शिवसेना पक्षात तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे शिवसेना उबाठा गटात आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेनेला दोन लोकसभेच्या जागा सोडल्या जाणार असून त्यातील दक्षिण मुंबईची जागा भाजपला सोडण्याचा निर्धार पक्का झाल्याने उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मुंबई हे मतदार संघ शिवसेनेला सोडावेच लागणार आहे. (North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Cotton Green Railway Station : कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन ते स्कायवॉक जोडणार, काढला ‘हा’ मार्ग)

भाजपने या मतदार संघाची जबाबदारी आमदार अमित साटम यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे विद्या ठाकूर, अमित साटम हे उमेदवार भाजपकडे आहेत, तर शिवसेनेकडे गजानन किर्तीकर हेच प्रमुख दावेदार आहेत. तर शिवसेना उबाठा गटाकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी त्यापेक्षा सुनील प्रभू, रविंद्र वायकर तसेच अनिल परब यांचेही पर्याय आहेत. तर काँग्रेसकडून संजय निरुपम यांनी पुन्हा या मतदार संघात फिरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची मोर्चेबांधणी जोरात सुरु असल्याने भाजप कोणत्याही परिस्थिती हा मतदार संघ सोडणार नसून त्यांना उत्तर पश्चिम मतदार संघावर दावा न करता शिंदे गटाच्या शिवसेनेला हा मतदार संघ सोडावाच लागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे किर्तीकर पुन्हा उभे राहिल्यास शिवसेना उबाठा गटाच्या अमोल किर्तीकर यांच्यापेक्षा सरस ठरणार नसून मोदी यांच्यासाठी भाजपला गजानन किर्तीकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार असल्याचेही बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.