उबाठा प्रमुख आणि विधान परिषद आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेतील चर्चेत सहभागी होणे दूरच पण गेल्या दोन वर्षात एकाही राज्य विधिमंडळ अधिवेशनात एकही तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही की लक्षवेधी मांडली नाही, अशी खात्रीलायक माहिती विधान भवनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली. (Uddhav Thackeray)
गेली दोन वर्षे आमदार
ऑक्टोबर २०१९ ला शिवसेनेने भाजपासोबत विधानसभा निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी २५ वर्षांची युती तोडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर १४ जुलै २०२० पासून उद्धव ठाकरे विधान परिषदेचे अधिकृत सदस्य झाले. जून २०२२ मध्ये शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे ४० आणि अपक्ष १० असे ५० आमदार फोडून महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले आणि भाजपासोबत सरकार स्थापन करीत ३० जून २०२२ ला मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. त्यामुळे गेली दोन वर्षे ते विधान परिषद आमदार म्हणून आहेत. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – एमआयएम कोल्हापुरात काढणार मोर्चा; सकल Hindu समाजाने दिला इशारा)
हजेरी केवळ तीन दिवस
त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार म्हणून फारच कमी वेळा राज्य विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली. विद्यमान विधानसभेचे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले. या जवळपास दोन आठवडे सुरू राहिलेल्या अधिवेशनात ठाकरे यांनी केवळ तीनच दिवस हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात अधिवेशनाचा पहिला दिवस, राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला तो दूसरा दिवस आणि १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेले मतदान म्हणजेच अधिवेशनाचा शेवटचा दिवस, असे तीन दिवस ठाकरे यांची विधान भवनात हजेरी लागली, असे सांगण्यात आले. (Uddhav Thackeray)
तर बहुतांश आमदार तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी मांडण्यासाठी धडपडत असताना ठाकरे यांनी मात्र अधिवेशनात एकही तारांकित प्रश्न किंवा लक्षवेधी मांडली नाही, असे विधान भवनमधील अधिकाऱ्याने सांगितले. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community