लॉकडाऊनला विरोध नाही, पण समाजातील शेवटच्या घटकाचे काय? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना येत्या २ दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घेणार असे सांगितले, तसेच याला विरोध करणाऱ्या विरोधकांवरही टीका केली, त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले. 

88

लॉकडाऊन लावायला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागतोच, पण म्हणून तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील समाजाच्या शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवे, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे. केवळ जगात आणि देशात कोरोना कसा वाढतो, हे सांगून चालणार नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्र्यांचे भाषण नक्की कशाकरता? 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी, २ मार्च रोजी जनतेला संबोधित करताना जे भाषण केले त्यामागील नक्की उद्देश कळलाच नाही. केवळ कोरोना वाढण्यामागची करणे सांगितली. परंतु उपाययोजना सांगितल्याच नाहीत. राज्यात कोरोना वाढत आहे, त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अपेक्षित होते. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हेही सांगायला हवे होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ विरोधकांवर तोंडसुख घेतले. विरोधक शिमगा करतात म्हणाले, रस्त्यावर उतरा म्हणाले. होय, आम्ही आजही रस्त्यावर उत्तराला तयार आहोत, वर्षभर आम्ही कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरलो होतो, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : लॉकडाऊनकरता मुख्यमंत्र्यांचा २ दिवसांचा अल्टिमेटम! )

या देशांनी जनतेला दिला दिलासा! 

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात जगभरात कोणकोणत्या देशांनी पुन्हा लॉकडाऊन लावला आणि कुणी कडक निर्बंध लावले हे सांगितले, मात्र त्या त्या देशांनी जनतेला आर्थिक दिलासा दिला असे सांगितले. त्याबाबत माहिती फडणवीस यांनी दिली.

  • फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला, पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले
  • हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’ पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला
  • डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती, पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज
  • ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत, पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
    एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत!
  • बेल्जियमने परत लॉकडाऊन केला, पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर
  • पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे, पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर
  • आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध, पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिले
  • फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत, पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिले
  • युके,जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिले

आव्हाडांना विस्मरणाचा रोग

यावेळी फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला आहे. राज्यातील जनतेला मदत न करणारे हे देशातील एकमेव सरकार आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले, इतर राज्यांनीही पॅकेज जाहीर केले, पण या सरकारने काहीच केले नाही. उलट लोकांची वीज कापली आणि लोकांना त्रास दिला. कोविड काळात लोकांना त्रास देणारे हे एकमेव सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.