Kangana Ranaut आणि ममता यांच्यावर आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

171

भाजपाने अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना उमेदवारी घोषित करताच मंडी मतदार संघातील त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया श्रीनेट यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली. तर भाजपचे खासदार दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली या दोन्ही प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत या प्रकरणी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूक पॅनेलने म्हटले आहे की, दोन्ही टिप्पण्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षांना सन्मान राखण्याचा सल्ला दिला आहे. दोघांनाही 29 मार्चच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपा खासदार दिलीप घोष म्हणाले होते की, ममतांनी त्यांचे वडील ठरवावे. ममता गोव्यात गेल्यावर स्वतःला गोव्याची मुलगी म्हणवते. त्रिपुरात ती स्वतःला त्या ठिकाणची मुलगी म्हणवते. त्यांचे वडील कोण हे त्यांनी ठरवावे. कोणाचीही मुलगी होणे चांगले नाही.

(हेही वाचा Congress : सांगलीत उबाठा उमेदवार माघार घेणार की काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढणार? विश्वजित कदमांच्या दिल्लीवारीने चर्चेला उधाण )

तर काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया श्रीनेट यांनी 25 मार्च रोजी कंगनाबद्दल (Kangana Ranaut) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. इंस्टाग्रामवर कंगनाचा फोटो पोस्ट करताना सुप्रिया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘मंडीमध्ये किंमत काय आहे, कोणीतरी सांगेल.या पोस्टच्या एक दिवस आधी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 2024 ची पाचवी यादी जाहीर केली होती. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला हिमाचलच्या मंडीमधून उमेदवारी दिली होती.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.