राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे, अर्जावर उत्तर दाखल करा असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. नववीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. अर्जावर नोटीस जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. माध्यमांशी बोलण्यास बंदी असतानाही, वक्तव्य केल्यामुळे ही नोटीस न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला देण्यात आली आहे. 18मे पर्यंत बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ
एकीकडे बीएमसीचे अधिकारी राणा दाम्पत्याच्या घराचे मोजमाप करत आहेत. तर दुसरीकडे राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना झाले आहे. त्यात आता न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
( हेही वाचा: एसटीच्या तिकीट मशीनचे तीनतेरा; जुन्या तिकीटांचा करावा लागतोय वापर )
राणा दाम्पत्याकडून न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन
रविवारी रुग्णालयांतून बाहेर येताच, नवनीत राणा यांनी वक्तव्य केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्यात आव्हान दिले. नवनीत राणांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या शर्तींचे उल्लंघन केल्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकारी वकील यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचे सांगितले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता याच अर्जावर उत्तर देण्यास न्यायालयाने म्हटले आहे.