Balasaheb Thackeray Memorial : स्मृतिस्थळावरील राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस

प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

136
Balasaheb Thackeray Memorial : स्मृतिस्थळावरील राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी शिवसेनेच्या दोन गटात गुरुवारी (१६ नोव्हेंबर) रात्री झालेल्या राड्याप्रकरणी शिवाजी पार्क (Balasaheb Thackeray Memorial) पोलिसांनी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ५० ते ६० अज्ञात व्यक्ति विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केलेल्या फुटेज वरून आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अशातच आता शिवाजी पार्कवरील (Balasaheb Thackeray Memorial) राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे.

(हेही वाचा – MRVC: बोरिवली आणि विरारदरम्यान दोन मार्गिकांचे काम डिसेंबरपासून हाती घेणार)

नेमकं प्रकरण काय ?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या (Balasaheb Thackeray Memorial) पूर्व संध्येला दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या स्मृती स्थळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शन घेऊन गेल्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी उबाठा गट आणि शिंदे गटाचे शिवसैनिक दाखल झाले. तेव्हा स्मृती स्थळावर दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

दरम्यान दोन्ही गट आमनेसामने आले व दोन्ही गटातील शिवसैनिकानी (Balasaheb Thackeray Memorial) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले.दोन्ही गटाच्या घोषणाबाजी आणि आरोप प्रत्यारोप मुळे शिवाजी पार्क परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांकडून दोन्ही गटांना स्मृतीस्थळावरून बाहेर काढून त्यांना शांततेचे आवाहन केले. परंतु दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोन्ही गटातील शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले त्यात स्मृतीस्थळाच्या सुरक्षेसाठी असलेले स्टील पाईपचे कुंपण तुटले. (Balasaheb Thackeray Memorial)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.