आता फसवणूक भोवणार, सदावर्तेंचा अकोट पोलीस ताबा घेणार?

136
संपकरी एसटी महामंडळाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. आता त्यांचा अकोट पोलिसांना ताबा हवा आहे. तसा अर्ज त्यांनी न्यायालयात केला आहे. या अर्जावर सुनावणी झाली असून अकोट न्यायालयाने सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी अकोट पोलिसांना परवानगी दिली आहे. मंगळवारी, १९ एप्रिल रोजी या संदर्भात अधिकृत आदेश निघणार आहेत.

अकोट पोलीस घेणार ताबा 

या प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी अजयकुमार बहाद्दुरसिंग गुजर आणि प्रफुल मनोहरराव गावंडे या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळावी या मागणीसाठी अकोट पोलीस न्यायालयात विनंती करणार आहेत. एसटी कामगारांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, अजयकुमार गुजर आणि प्रफुल गावंडेंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

न्यायालयाने दिली परवानगी

अकोल्यातील अकोट शहर पोलिसात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले वकील गुणरत्न सदावर्तें यांचा ताबा मिळावा, यासाठी आज शनिवारी अकोट शहर पोलिसांनी अकोट न्यायालयात प्राथमिक अर्ज सादर केला आहे. मात्र काही कारणांमुळे तो अर्ज रविवारी परत घेण्यात आला. परंतु, आज सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी नव्याने न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी झाली असून अखेर न्यायालयाने सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात उद्या अधिकृत आदेश निघणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.