चीनचे भारताच्या विरोधात कारस्थान; भारतीय सैन्याचे हिंदी संभाषण ओळखण्यासाठी ‘ऑपरेशन’

85

चीन आता भारताच्या विरोधात नवे कारस्थान रचत आहे. सीमाभागात भारतीय सैन्याचे हिंदी भाषेतील संभाषण ओळखता यावे, म्हणून चीनने हिंदी भाषा डिकोड करण्यासाठी विशेष ऑपरेशन सुरु केले आहे. चीनने आधीच 2022 मध्ये ही टीएमडी म्हणजेच तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टमध्ये हिंदी ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटरच्या भरतीसाठी तरुण पदवीधरांचा शोध सुरू केला होता. आता चीनचा हा शोध एका वर्षात संपला. गुप्तचर रिपोर्टनुसार, चीनी पीएलएने अलीकडेच अशा 19 विद्यार्थ्यांना सामील केले आहे, ज्यांची हिंदीवर मजबूत पकड आहे.

हिंदीत प्रवीण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली

हिंदी ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटरचा समावेश करण्यामागील काही प्रमुख उद्दिष्टांमध्ये चीनी पीएलएसाठी गुप्तचर माहिती गोळा करणे, भारतीय सैन्याच्या सैनिकांच्या संभाषणांचे ट्रान्सक्रिप्टला मँडरिनमध्ये ट्रान्सलेट करणे आणि एलएसीवरील हेरगिरी यांचा समावेश आहे. याशिवाय, हे लोक भारतीय लष्कराचे संभाषण समजून घेण्यासाठी एलएसीवर तैनात असलेल्या सैनिकांना हिंदी शिकवतील. टीएमडीच्या अनेक अधिकार्‍यांनी 25 मार्च 2022 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान चीनमधील अनेक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांना भेटी देऊन हिंदीत प्रवीण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली. यादरम्यान, हिंदी इंटरप्रेटरची गरज आणि पीएलएमधील त्यांचे कार्य समजावून सांगण्यासाठी परिसंवाद आणि व्याख्याने देण्यात आली. या भरतीसाठी अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली होती. चीनने तिबेटची शिक्षण व्यवस्था आधीच बदलली आहे. सर्व शाळांमध्ये मँडरिन भाषा ही पहिली भाषा म्हणून लागू करण्यात आली आहे. तसेच, चिनी सैन्य आता एलएसीजवळील गावांमध्ये तिबेटी कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या मुलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर रिपोर्टनुसार, चीनी पीएलए लष्करी छावणीत 10 ते 18 वयोगटातील मुलांना चीनी, बोधी आणि हिंदी भाषेचे प्रशिक्षण देत आहे.

(हेही वाचा Supreme Court: बहुमत नसलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का? शिंदे गटाच्या वकिलांची विचारणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.