आता महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद!

100

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

नुकतेच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर केला होता. मुंबईत दिवसागणिक रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालये देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला.

(हेही वाचा राज्यात ‘असे’ होतेय शिक्षणाचे इस्लामीकरण!)

उदय सामंत काय म्हणाले?

  • राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यीक विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
  • पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार, परीक्षा ही ऑनलाईन होणार
  • काही कारणास्तव विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी
  • प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश
  • वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय
  • परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार
  • विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना
  • 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार
  • हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.