आता कारवाईच्या भीतीने अस्लम शेख यांची धावाधाव, फडणवीसांची घेतली भेट

133
रविवारी, ३१ जुलै रोजी ईडीच्या १० पथकाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची साडेनऊ तास चौकशी केली, त्यानंतर त्यांना अटक केली. या अटकेनंतर राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. आता अन्य राजकीय नेतेही संवाद झाले आहे. राऊतांवरील कारवाईमुळे अनेकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे, असे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांची झोप उडाल्याचे दिसत आहे. त्यांनी रविवारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप 

अस्लम शेख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या सोबत भाजप नेते मोहित कंबोज हेही होते. या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर थेट 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसे रिसॉर्ट बांधले, तसेच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत. समुद्रात सर्व नियमांचे उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे अस्लम शेख यांच्या पाठिमागे देखील ईडीचा ससेमिरा लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होता. ईडीची पीडा मागे लागू नये म्हणून खबरदारीचा भाग म्हणून अस्लम शेख आता सक्रिय झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.