‘आता राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी’: मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा

93
‘आता राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी’: मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा
‘आता राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी’: मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा

Chandrashekhar Bawankule : राज्यात कोणत्याही जिल्ह्यात बसून आता घराची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी सरकारने नवे धोरण महाराष्ट्र दिन १ मे पासून लागू होईल. तसेच ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली आहे. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – वक्फच्या जमिनीत मागील बारा वर्षात २१ लाख एकरची वाढ; Amit Shah यांची लोकसभेत माहिती) 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

कुठेही बसून करता येणार घराची नोंदणी
पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया (One State One Registration Faceless Process) असेल. तुमचे आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया (Digital India), डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीसाठी पुढील उद्दिष्ट काय, त्याने स्वत:च केलं स्पष्ट!)

डिजिटल स्वाक्षरी असणार अनिवार्य
कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्यास, दस्तऐवजावर विभागाचा अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करील. सुरक्षिततेच्या उपायासाठी, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या पडताळणीद्वारे ओळख अनिवार्य केली जाईल. तसेच, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीने दस्त सादर करणे अनिवार्य करण्यात येईल, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.