अफगाणिस्तानात तालिबान्यांचे नव्हे इसिसचे राज्य?

अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष अमृल्ला सालेह यांनी अफगाणिस्तान तालिबान्यांची नव्हे तर इसिसची सत्ता आहे, आमच्याकडे पुरावे आहेत, असे ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

151

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेताच तालिबान्यांनी दहशतवादाच्या जोरावर अफगाणिस्तान ताब्यात घेतले, मात्र अमेरिकेने काबूल विमानतळाचा ताबा घेऊन तेथून अमेरिकेतील नागरिक आणि शरणार्थी अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी काबूल विमानतळाच्या बाहेर 3 शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून किमान १०० जणांना ठार करण्यात आले आहे. याची जबाबदारी इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष अमृल्ला सालेह यांनी अफगाणिस्तान तालिबान्यांची नव्हे तर इसिसची सत्ता आहे, आमच्याकडे पुरावे आहेत, असे ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

काय म्हटले आहे अमृल्ला सालेह यांनी?

अफगाणिस्तानचा ताबा घेतलेल्या तालिबान्यांमध्ये इसिस आणि हक्कानी नेटवर्क यांची मूळ रोवलेली आहेत, याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र तालिबानी हे स्वीकारत नाहीत. तालिबान्यांनी त्यांचे मास्टर इसिसकडूनच प्रशिक्षण घेतले आहे.

पाकिस्तानी सैन्यानेही दिले प्रशिक्षण

अमृल्ला सालेह यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियातून अफगाण नागरिकांनी मत मांडायला सुरुवात केली आहे. हक्कानी नेटवर्कपासून मोठा गट वेगळा झाला असून तो दीश-के नावाने स्थापन झाला आहे. या दोघांना इसिस आणि पाकिस्तान सैन्याने प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे.

आपल्या अफगाणिस्तानचे सैन्य कुठे आहे? त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे का? जर नसेल तर कृपया याना पुन्हा जमवा आणि जगभरातील अफगाणींकडून अर्थसहाय्य मागा, ते सर्व निश्चित मदत करतील, असे आवाहन एक अफगाण नागरिकाने ट्विटर द्वारे केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.