आता पक्षाचं नामकरणही टिपू सेना करा!

107

प्रजासत्ताक दिनी मालाड मालवणी येथील खेळाच्या मैदानाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात आले. भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी या नामकरणाला कडाडून विरोध केला. आता यात मनसेचे नेते संतोष धुरी यांनी ट्विट करत आपला विरोध दर्शवला आहे. पेंग्विनचे नामकरण झाले, आता तुमच्या पक्षाचे पण नामकरण टिपू सेना करा, असा थेट सल्लाच त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

असं आहे ट्विट…

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत, पेंग्विनच नामकरण केलं, आता पक्षाचं पण नामकरण टिपू सेना करा. तसेच विचार तर बदलले आहेतच आता भगव्या झेंड्या ऐवजी हिरवा झेंडा हातात घ्या, असं ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

( हेही वाचा: ठाकरे सरकारला झटका! भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय)

भाजप आक्रमक 

याआधी भाजप नेत्यांकडूनही राज्य सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका केली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्मांध प्रवृत्ती फोफावताना दिसत आहेत. स्थानिकांनी या नामकरणाला विरोध केला असतानाही आमची हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेने मात्र, यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे, अशी टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.