नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषदेत मतदान करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर, मलिक आणि देशमुख यांनी आता सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. दुपारी 4 पर्यंत मतदान करण्याची मुदत आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात आता थोड्याच वेळात सुनावणी केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community