मोठी बातमी! मलिक आणि देशमुख यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी परवानगी मिळणार?

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषदेत मतदान करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर, मलिक आणि देशमुख यांनी आता सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. दुपारी 4 पर्यंत मतदान करण्याची मुदत आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात आता थोड्याच वेळात सुनावणी केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here