राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणि ईडीकडून पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरु आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरुळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयांवर छापा मारला. तर पुण्यातही कारवाई सुरु असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कोंडवा भागातील PFI कार्यालयावर छापेमारी केली आहे. पुण्यात PFI आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे. एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयीन काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंडवा भागात आहे.
( हेही वाचा: “दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा ठाकरे गटाला कोणताही अधिकार नाही”; शिंदे गटाची उच्च न्यायालयात याचिका )
या ठिकाणी तयार करताहेत प्रशिक्षण केंद्र
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरु आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरु केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत ( 153 अ, 121अ, 109,120ब) आणि यूएपीए कलम 13(1) मध्ये अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community