Congress : आता कॉंग्रेसची बारी! १६ आमदार फुटणार; पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी सुरू

164
Congress : उत्तर प्रदेशात काॅंग्रेस राम भरोसे
Congress : उत्तर प्रदेशात काॅंग्रेस राम भरोसे
  • सुहास शेलार

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार भाजपाच्या तंबूत विसावल्यानंतर आता कॉंग्रसमध्ये मोठी फूट पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेश कॉंग्रेसमधील १६ आमदार सत्तेत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून, केवळ अमित शहांच्या होकाराची प्रतिक्षा असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीतील बंडामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शहरापासून गावापर्यंत, चौकाचौकांत, नाक्या-नाक्यांवर, गल्लीबोळात राष्ट्रवादीतील फुटीविषयीच्या चर्चा चवीचवीने चघळल्या जात आहेत. परंतु, हा केवळ ‘ट्रेलर’ असून, खरा ‘पिक्चर’ अद्याप बाकी असल्याची माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती लागली आहे.

कॉंग्रेसमधील १६ आमदारांचा गट भाजपामध्ये येण्यासाठी राजी झाला आहे. त्याचे नेतृत्त्व खुद्द अशोक चव्हाण करीत असून, पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी सुरू आहेत. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, विश्वजीत कदम, धीरज देशमुख, अमर राजूरकर, संग्राम थोपटे यांच्यासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांचा त्यात समावेश आहे.

(हेही वाचा Robots : जीनिव्हात 51 रोबोट्सने घेतली पत्रकार परिषद; पत्रकारांच्या प्रश्नांना दिली थेट उत्तरे )

भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवसेना एकत्र लढली, तर लोकसभेला शिवसेना-भाजपा युतीला २० हून अधिक जागा मिळणार नाहीत. शिवाय एकट्या शिंदेंच्या भरवशावर विधानसभेला पूर्ण बहुमत मिळणे शक्य नसल्यामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लावत आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली. त्यापाठोपाठ कॉंग्रेसमध्येही फूट पाडल्यास विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या होतील, अशी रणनीती भाजपाकडून आखली जात आहे.

बंड कधी होणार?

सध्या कॉंग्रेसकडे ४४ आमदारांचे बळ आहे. त्यातील १६ जणांचा गट फुटला, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत बंदी कारवाई होऊ शकते. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी इतक्यात हे पक्षप्रवेश होणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला भगदाड पाडले जाईल, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.