गोव्यात शिक्षकांवर अनोखी सक्ती, आता संध्याकाळपर्यंत सुट्टीच नाही

130

गोवा सरकारकडून शिक्षकांसाठी आता एक अनोखा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार आता गोव्यातील शिक्षकांना रेमेडियल वर्ग घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. या वर्गांमुळे शिक्षकांना संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत शाळेतून सुट्टी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत गोवा विधानसभेत माहिती दिली आहे.

गोवा सरकारचा निर्णय

शिक्षणात मागे असणा-या विद्यार्थ्यांसाठी हे रेमेडियल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. गोव्यातील सर्वच सरकारी,अनुदानित आणि विना अनुदानित विद्यालयांना हे वर्ग घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. पण सरकारच्या या निर्णयाविरोधात कोणत्याही तक्रारी घेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभा आमदारांना केले आहे. या निर्णयाबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे पहिले ट्वीट, ‘म्हणाले प्रतिकूल परिस्थितीत…’)

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत

केवळ रेमेडियल वर्गांमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणे अशक्य असल्याचे बाणावलीचे आमदार वेन्सी वीएगश यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली आहे. प्राथमिक इयत्तेपासूनच शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिक्षक भरती करतानाच या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक आहे. भरती केलेले शिक्षक हे सक्षम नसतील तर त्याचा काही फायदा नाही, असे विएगश यांनी सभागृहात सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.