मोहित कंबोज यांनी बर्याचदा असं विधान केलं होतं की, सलीम आतमध्ये गेला आहे, लवकरच जावेदसुद्धा आत जाईल. सलीम जावेदची जोडी जेलमध्ये शेजारी राहतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सलीम कोण आहे आणि जावेद कोण आहे. सलीम म्हणजे नवाब मलिक आणि जावेद म्हणजे संजय राऊत.
( हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुलांनी बनवलेल्या राख्या सीमेवरील जवानांना )
आता तुम्हाला आणखी प्रश्न पडला असेल की, यांना मोहित कंबोज सलीम-जावेद का म्हणतात? हे दोन असे नेते आहेत, जे सतत पत्रकारांसमोर यायचे. यात संजय राऊतांचा हात कुणीच पकडू शकणार नाही. पत्रकारांसमोर रोज नवी कथा रचायचे, विधानं करायचे आणि पत्रकार दिवसभर ती बातमी चघळत बसायचे. अशा स्क्रिप्ट्स लिहिणारे हे दोन स्क्रिप्ट रायटर सलीम-जावेद, नवाब-संजय.
आता कंबोज यांच्या म्हणण्यानुसार दोघेही जेलमध्ये गेलेले आहेत. कंबोज यांना ज्योतिष विद्या अवगत आहे का ते पाहावे लागेल. असो…मूळ प्रश्न असा आहे की आता हे दोन महान स्क्रिप्ट रायटर जेलमध्ये गेले असल्यामुळे राजकीय शोले चित्रपटाची स्क्रिप्ट कोण लिहिणार? कारण चित्रपटात हीरो जितका मोठा असतो, त्याच्यापेक्षा व्हिलन जास्त मोठा असतो आणि कोणताही स्क्रिप्ट रायटर व्हिलनवर खूप काम करतो.
सलीम-जावेद जेलमध्ये गेल्यामुळे रोजच्या शोलेला आपण मुकणार
बॅटमॅन चित्रपटातील जोकर हा तितकाच मोठा व्हिलन होता, म्हणूनच बॅटमॅनला महत्व प्राप्त झालं. गब्बर सिंहमुळे जय आणि विरु उठून दिसतात. ज्यावेळी सशक्त व्हिलनचा पराभव हीरो करतो, ज्यावेळी रसिकांची उत्सुकता शिगेला ताणली जाते. तर ही राजकीय स्क्रिप्ट आता अधूरी राहिलेली आहे. सलीम-जावेद दोघेही आता जेलमध्ये गेलेले आहेत. त्यांची जागा कुणीतरी घ्यायला हवी. कदाचित गब्बर सिंह किंवा सांभा ही जबाबदारी स्वीकारु शकतील. पण या चित्रपटातले जय आणि विरु हे स्वयंभू आहेत. ते लेखकाने लिहिल्याप्रमाणे किंवा दिग्दर्शकाने दिग्दर्शन केल्याप्रमाणे भूमिका साकारत नाहीत. ते आपली भूमिका स्वतः तयार करतात.
आता इथे गब्बर कोण, सांभा कोण, जय आणि विरु कोण? हे सांगायची गरज वाटत नाही. वाचक प्रचंड सजग असतात. बाकी, सलीम-जावेद जेलमध्ये गेल्यामुळे रोजच्या शोलेला आपण मुकणार आहोत. ही जागा लवकरच कुणीतरी भरुन काढावी एवढीच प्रार्थना आपण करु शकतो.
Join Our WhatsApp Community