राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे नवाब मलिक. मलिकांनी मागच्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदांची सरबत्ती लावत, विरोधी पक्षनेत्यांवर अनेक आरोप केले आहेत. आता मलिकांनी नुकतीच एक खळबळजनक पत्रकार परिषद घेत भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
ईडीकडे करणार विचारणा
भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे .याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी धडकणार ईडीच्या कार्यालयात
भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली आहे. तयार केलेली संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री आणि नेते वेळ घेऊन ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून ईडीला भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही? हे तपास का थांबले आहेत ? याची माहिती घेणार असल्याचं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले आहे. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत, त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिकार्यांना करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
(हेही वाचा : ड्रग्स प्रकरणात मलिकांनी आता केली ‘ही’ मागणी)
Join Our WhatsApp Community