मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून, त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले.
( हेही वाचा : सार्वजनिक बांधकाम विभागासाठी स्वतंत्र महामंडळ? हालचालींना वेग)
मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.
मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि ‘जनहिताय सर्वदा’ घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रती निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. त्यामुळे आता मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे, असे बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रीत होणार आहे.
Join Our WhatsApp Community