शालेय विद्यार्थ्यांचे दप्तरातले ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय पाठ्यपुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्यावर सरकारचा विचार सुरु आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात विचार मांडला आहे. आता याबाबतीत बालभारतीच्या वतीने एक सर्व्हे केला जात आहे.
पुस्तकांमध्ये वह्यांची पाने लावली तर ती किती असावीत, कोणत्या इयत्तेसाठी किती असावीत, कोणत्या विषयात किती असावीत, विद्यार्थ्यांना या पानांचा खरा उपयोग होईल का? अभ्यास करताना विद्यार्थी यात नोंदी करतील का, यामुळे वह्यांचा वापर थांबेल का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न बालभारतीच्यावतीने विचारण्यात आले आहेत.
( हेही वाचा: “मांजर लपून दूध पीत होती तर…चौकशी झालीच पाहिजे”; मनसेचे पेडणेकरांवर टीकास्त्र )
अनुभवी व्यक्तींना उत्तरे देण्याचे आवाहन
https://academics.balbharati.in/notebook या लिंकवर बालभारतीच्यावतीने एक प्रश्नावली अपलोड केली आहे. त्यात सदर योजनेअंतर्गत काही प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींनी यांची उत्तरे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community