एका विधानसभेत आता तीन मंडल अध्यक्ष, BJP ४५ वर्षांवरील पदाधिकाऱ्यांना देणार डच्चू

244
एका विधानसभेत आता तीन मंडल अध्यक्ष, BJP ४५ वर्षांवरील पदाधिकाऱ्यांना देणार डच्चू
एका विधानसभेत आता तीन मंडल अध्यक्ष, BJP ४५ वर्षांवरील पदाधिकाऱ्यांना देणार डच्चू

विशेष प्रतिनिधी

BJP : आता मोठा पक्ष झालेल्या भाजपाने पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना पदाधिकारी पदाचा माथी टिळा लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता एका विधानसभेसाठी असलेल्या अध्यक्ष (Assembly Speaker) पदाचे अर्थात मंडल अध्यक्ष (Mandal President) पदाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या एका मंडल अध्यक्षांच्या तुलनेत आता तिथे मंडल अध्यक्षांची तीन पदे निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे आता दोन ते तीन नगरसेवक प्रभागांकरता एक मंडल अध्यक्ष हे पद निर्माण केले जाणार आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत (municipal elections) पार्श्वभूमीवर पदाधिकारी नेमून त्यांच्यावर नवीन जबाबदारी टाकत एक प्रकारे पक्षाचे काम करणारे अनेक हात निर्माण केले जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना डच्चू देत त्या खालील वयाच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संधी देण्याच्या विचारात असल्याचीही माहिती मिळत आहे. (BJP)

(हेही वाचा – Veer Savarkar यांचा अवमान केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका; समन्स रद्द करण्यास नकार)

शिवसेनेसोबत (Shivsena) असताना पक्षाची प्रगती खुंटलेली असताना २०१४ च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाने मुंबई (Mumbai) महाराष्ट्रासह देशात मजबूत पाय रोवले. त्यानंतर झालेल्या २०१७ मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने युतीत निवडणूक न लढवता स्वतंत्र निवडणूक लढवत आजवरच्या युतीत मिळवलेल्या यशापेक्षा दुपटीने अधिक जागा निवडून आणल्या. या निवडणुकीत तब्बल ८२ नगरसेवक भाजपाचे निवडूण आले. तर त्यानंतरच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे शतक पार म्हणजे १०६ आमदार निवडून आले. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे ०९ खासदार तर विधानसभा निवडणुकीत १३२ आमदार निवडून आले आहेत. त्यात मुंबईत १ खासदार आणि १५ आमदार निवडून आले आहेत.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाने कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पदाधिकारी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या असलेल्या पदाधिकारी संख्येत इतर कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे शक्य नसल्याने पक्षात मंडल अध्यक्ष पदे वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यात एका विधानसभा क्षेत्रासाठी असलेल्या मंडल अध्यक्षाच्या तुलनेत आता दोन किंवा तीन प्रभागांकरता आवश्यकतेनुसार प्रत्येकी एक मंडल अध्यक्षपद निर्माण करून त्या पदी कार्यकर्त्याची वर्णी लावत त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकण्याचा आणि पक्षाच्या कामात त्यांना सक्रीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – गुन्हे सिद्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार; पोलिसांना मिळणार टॅब; CM Devendra Fadnavis यांची माहिती)

मात्र, आतापर्यंत मंडल अध्यक्ष नेमताना वयाची अट नसली तरी आता वय वर्षे ३५ ते ४५ या वयोगटातील कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांचीच नेमणूक करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे भाजपात एका विधानसभेत तीन मंडल अध्यक्ष बनलेले पहायला मिळणार असून सद्या जे कुणी मंडल अध्यक्ष ४५ वयापेक्षा अधिक आहेत, त्यांच्यावर त्यापेक्षा मोठ्या पदाची जबाबदारी टाकली जाईल किंवा त्यांना या पदावरून कायमचेच बाजूला केले जाईल अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी पक्षात ज्यांची काम करण्याची हातोटी आहे. वक्तृत्व आहे. अभ्यास आहे. चांगले विषय समजून मांडू शकतात. भाषांचे चांगले ज्ञान आहे. त्या भाषा ते चांगले बोलू शकतात. पक्षाच्या कार्यक्रमात तसेच अभियानात ज्यांनी अधिक मेहनत घेतली आहे. अधिक सदस्य नोंदणी केली आहे. तसेच ज्यांचा जनसंपर्क चांगला आहे. या सर्व निकषांच्या आधारे हे मंडल अध्यक्ष बनवले जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.