मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; Ramesh Chennithala यांचा मित्रपक्षांना इशारा

45
मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; Ramesh Chennithala यांचा मित्रपक्षांना इशारा
  • प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, असा सज्जड इशारा प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी पक्षाचे बंडखोर व मित्र पक्षांतील नेत्यांना गुरूवारी (७ नोव्हेंबर) एका पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

गुरुवारी टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चेन्निथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षम ल्लिकार्जुन खरगे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार असल्याची माहितीही चेन्निथला यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Delhi Air Pollution: दिल्लीतील AQI 367 च्या वर; यमुनेच्या काठावर छठपूजेस बंदी, त्वचाविकाराचा धोका वाढला)

वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाणार असून १० नोव्हेंबरला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामाही प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Elections 2024: दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला ?)

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्निथला (Ramesh Chennithala) म्हणाले की, महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. त्याचवेळी भाजपाकडून काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नसल्याबद्दल काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रारही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी भाजपाला दिला.

कारण या अगोदर कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणीही सुरु असूनही भाजपा जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे. महालक्ष्मी योजनेसह सर्व गॅरंटी जाहिर करताना त्याचा अभ्यास केला असून आर्थिक तरतूद कशी केली जाईल यावर सखोल चर्चा करुनच त्या जाहीर केल्या आहेत, असेही चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.