संजय पांडेंचा मुक्काम कोठडीतच, न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

97

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली ईडीकडून अटक झाली आहे. संजय पांडेंची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी त्यांना रोज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १६ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कोठडीनंतर पांडे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल कऱण्यात आला आहे. यावर गुरूवारी न्यायालयाने संजय पांडेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे पांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे.

(हेही वाचा – Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!)

संजय पांडेंनी अर्जात काय म्हटले

आपण अनेक हायप्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास केला आणि खटले चालवले. तसेच त्वरीत कार्यवाही देखील केल्या. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्याचा हा राजकीय सूड आहे. सन २००९ ते २०१७ दरम्यान कथितरित्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास २०२२ मध्ये केला जात आहे. म्हणजेच या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तेरा वर्षांनंतर आणि ते बंद झाल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा सुरु झाले. तेही मी माझं कार्यालय सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत या चौकशीला सुरुवात झाली, यावरुन हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.