Nuh Violemce : नूह हिंसाचारात रोहिंग्या, बांगलादेशी मुसलमानांचा समावेश; प्रशासनाने 250 झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवला

155

हरियाणातील नूह Nuh Violemce येथे 31 जुलै 2023 रोजी हिंदूंच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्यानंतर हरियाणा सरकारने कठोर पावले उचलली आहेत. राज्य सरकारने गुरुवारी, 3 जुलै, 2023 रोजी  संध्याकाळी परिसरातील सुमारे 250 झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चढवला. या झोपडपट्ट्या रोहिंग्या मुसलमान घुसखोरांच्या आहेत. यावेळी जलद कृती दल तैनात करण्यात आले होते.

तत्पूर्वी, गुरुवारी, ३ जुलै २०२३ रोजी रात्री सरकारने नूह Nuh Violemce जिल्ह्यातील एसपी वरुण सिंगला यांची बदली केली. हिंसाचाराच्या दिवशी ते रजेवर होते. सिंग यांना यांच्याकडे भिवानी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी नरेंद्र बिजार्निया यांना नुहाची जबाबदारी देण्यात आली आहे. बिजारनिया हे भिवानीचे एसपी होते.

म्यानमारमधून बेकायदेशीरपणे आलेले रोहिंग्या तावडू येथे राहत होते, जिथे हरियाणा सरकारने बुलडोझर वापरून रोहिंग्यांच्या झोपड्या हटवण्यात आली. हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऍथॉरिटीच्या जमिनीवर रोहिंग्यांची 250 हून अधिक कुटुंबे गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीर कब्जा करून राहत होती. येथे रोहिंग्या मुसलमान चिंध्या उचलणे आणि रद्दी विकण्याचे काम करत होते. याशिवाय या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने संपादित केल्या आहेत, त्यांनीही या रोहिंग्यांना भाड्याने दिल्या होत्या आणि त्या बदल्यात ते त्यांच्याकडून भाडे वसूल करत होते. हे लोक नूह हिंसाचारात सहभागी होते. दंगल पसरवल्याबद्दल पोलिसांच्या एफआयआरमध्ये अनेक रोहिंग्या तरुणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. यातील काहींना पोलिसांनी अटकही केली आहे.

(हेही वाचा केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.