राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटते, तरी नवीन जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा! 

सोमवार, १० मेपासून राज्यातील सिंधुदुर्ग, परभणी आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार आहे. आतापर्यंत १६ जिल्ह्यांमध्ये सरकारने कडक लॉकडाऊन लावला आहे. त्यात ३ जिल्ह्यांची वाढ झाली आहे. 

राज्य शासन दररोज प्रसिद्ध करत असलेल्या आकडेवारीवरून राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. जिल्हानिहाय आकडेवारीतही दररोजच्या नवीन रुग्ण संख्येत घट होऊ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही राज्य सरकार मात्र नवनवीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत आहे. सोमवार, १० मेपासून राज्यातील सिंधुदुर्ग, परभणी आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार आहे. आतापर्यंत १६ जिल्ह्यांमध्ये सरकारने कडक लॉकडाऊन लावला आहे. त्यात ३ जिल्ह्यांची वाढ झाली आहे.

एका बाजूला राज्य सरकार रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असल्याची आकडेवारी देत आहे आणि दुसरीकडे एकापाठोपाठ एक नवनवीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावत आहे. याचा स्पष्ट अर्थ निघतो कि, सरकार खोटी आकडेवारी देत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. असे नसते तर सरकारने नवनवीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावले नसते आणि आता राज्यसरकार जे राज्यभरात लावलेले कडक निर्बंध आहेत, तेही वाढवण्याच्या विचारात आहे. यातून सरकारची ही फसवेगिरी आहे, हे दिसून येते.
– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

काय म्हणते आकडेवारी?

  • राज्य सरकारच्या दररोजच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे.
  • रविवार, ९ एप्रिल रोजी राज्यात दैनंदिन रुग्ण संख्या ४८ हजार ४०१ होती, तर शनिवार, ८ एप्रिल रोजी हीच आकडेवारी ५३ हजार ६०५ इतकी होती.
  • एक दिवसात तब्बल ५ हजार रुग्णांची यात घट झाल्याचे आढळून आले आहे.
  • मागच्या आठवड्यातच महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ६५ हजारापर्यंत वाढलेली होती.
  • त्या तुलनेत रविवारच्या रुग्णसंख्येत तब्बल १७ हजार रुग्णसंख्या कमी झालेली आहे.
  • सोमवार, १० एप्रिलच्या रात्रीपासून सिंधुदुर्ग, बुलढाणा आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
  • या तीन जिल्ह्यांमध्येही ९ एप्रिल रोजी अनुक्रमे ५९७, १०८७ आणि ५९७ इतकी रुग्णसंख्या होती.
  • तर ८ एप्रिल रोजी ही संख्या अनुक्रमे ६३०, १५४७ आणि ३८२ इतकी रुग्ण संख्या होती.
  • अशा प्रकारे या तीनही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या कमी झालेली असतानाही या तीनही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.

आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांत लावला कडक लॉकडाऊन? 

सोलापूर, लातूर, बदलापूर, वर्धा, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, नांदेड, वासिम, अमरावती, यवतमाळ, अकोला, इंदापूर, बारामती, पंढरपूर.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here