नव्या पाच विधानसभांमध्ये किती आहेत शिक्षित आमदार? 2017च्या तुलनेत अशी आहे आकडेवारी

या विधानसभांमध्ये निवडून आलेल्या आमदारांमध्ये शिक्षित आमदारांची संख्या किती आहे याची माहिती एका अभ्यासाद्वारे समोर आली आहे.

193

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये काही नव्या आमदारांना संधी मिळाली आहे, तर काही ठिकाणी जुन्या जाणकारांचा पत्ता कट झाला आहे.

या विधानसभांमध्ये निवडून आलेल्या आमदारांमध्ये शिक्षित आमदारांची संख्या किती आहे याची माहिती एका अभ्यासाद्वारे समोर आली आहे. पीआरअस लेजिस्लेटिव्हने निवडणूक आयोगाकडे असलेल्या माहितीवरुन हा अभ्यास केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये 2017च्या तुलनेत शिक्षित आमदारांची संख्या वाढली असून, गोव्यामध्ये ही संख्या सारखीच आहे. पंजाब आणि उत्तराखंड मध्ये मात्र शिक्षित आमदारांचा टक्का घसरल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचाः भारतात परदेशी ड्रोनवर बंदी, तरीही ‘या’ बंदरावर सापडले चिनी ड्रोन!)

उत्तर प्रदेशातील शिक्षित आमदारांची टक्केवारी

पीआरएस लेजिस्लेटिव्हच्या अभ्यासानुसार, उत्तर प्रदेशात शिक्षित आमदारांचा टक्का वाढला असल्याचे समजते. 2017च्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिक्षित आमदारांची टक्केवारी ही 72.7 टक्के इतकी होती. ही टक्केवारी 2022 मध्ये वाढून 75.9 टक्के इतकी झाली आहे. यामध्ये पदवीधर आमदारंची संख्या ही 40.7 टक्क्यांवरुन 41.9 टक्के, तर उच्च पदवीधर आमदारांची संख्या 32 टक्क्यांवरुन 34 टक्के झाल्याचे समजत आहे. शिक्षित आमदारांची वाढलेली ही टक्केवारी उत्तर प्रदेशसाठी समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे.

up 1

(हेही वाचाः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर होणार?)

 

उत्तराखंडमध्ये टक्का घसरला

उत्तराखंडमध्ये 2017च्या तुलनेत 2022च्या पाचव्या विधानसभेत शिक्षित आमदारांची संख्या कमालीची कमी झाल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये 77 टक्के असलेली शिक्षित आमदारांची संख्या ही 2022 मध्ये थेट 68 टक्क्यांवर आली आहे. यामध्ये पदवीधर आणि उच्च पदवीधर अशा दोन्ही आमदारांची संख्या कमी झाल्याचे अभ्यासावरुन स्पष्ट होत आहे. 2017 च्या निवडणुकीत उत्तराखंडमध्ये निवडून आलेल्या पदवीधर आमदारांची संख्या ही 44 टक्के इतकी होती, ती 2022 मध्ये 41 टक्क्यांवर आली आहे. तर उच्च पदवीधर आमदारांच्या आकडेवारीत तब्बल 6 टक्क्यांने घसरण झाली असून ही संख्या 33 टक्क्यांवरुन 27 टक्क्यांवर आली आहे.

uttar

(हेही वाचाः TheKashmirFiles काश्मिरी पंडिताचा आवाज पुन्हा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण…)

 

मणिपूरात पदवीधर घसरले, उच्च पदवीधर वाढले

मणिपूर विधानसभेमध्ये 2017च्या तुलनेत 2022 मध्ये चांगले चित्र पहायला मिळत आहे. 2017 मध्ये असलेली शिक्षित आमदारांची संख्या 68.4 टक्क्यांवरुन 2022 मध्ये 76.6 टक्के झाली आहे. यामध्ये पदवीधर आमदारांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये पदवीधर आमदारांची संख्या 46.7 टक्क्यांवरुन 2022 मध्ये 43.3 टक्क्यांवर आली आहे. तर उच्च पदवीधर आमदारांच्या संख्येत मात्र चांगलीच वाढ झाली आहे. 2017 मध्ये 21.7 टक्के असलेली उच्च पदवीधर आमदारांची संख्या 2022 मध्ये वाढून 33.3 टक्के झाली आहे.

mani

(हेही वाचाः बोर्डाच्या परीक्षेत यंदाही पेपरफुटी! कोणाला झाली अटक? वाचा)

पंजाबातही आकडा घसरला

पंजाब विधानसभेत देखील निवडून आलेल्या 117 आमदारांमध्ये शिक्षित आमदारांचा आकडा घसरला आहे. 2017 मध्ये पंजाबात शिक्षित आमदारांची संख्या ही 59.8 टक्के होती, ती आता 2022 मध्ये 58.2 टक्के झाली आहे. यामध्ये पदवीधर आमदारांची संख्या ही 44.4 टक्क्यांवरुन 38.5 टक्क्यांवर आली आहे. तर उच्च पदवीधर आमदारांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या 15.4 टक्क्यांवरुन 19.7 टक्के झाली आहे.

punjab 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.