प्रेषित महंमद पैगंबर यांच्या बाबत विधान केल्यावरून वादात सापडलेल्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना बलात्काराच्या आणि जीवे मागण्याच्या धमकी येत आहेत. याप्रकरणी नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
नुपूर शर्मा यांनी एका दूरचित्रवाणीच्या चर्चासत्रात प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल तथाकथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे भाजपाने त्यांना निलंबित केले. त्यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्सही बजावले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. याआधीही नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीत हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टिप्पणी केली होती. तसेच न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली.
(हेही वाचा शिवसेनेला आणखी एक धक्का! ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा)
पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे नजर
सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर नुपूर शर्मा यांनी आता असा युक्तीवाद केला आहे की, त्यांना असामाजिक तत्वांकडून पुन्हा बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालय काय मत मांडते हे पहावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community