बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) हिने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नुसरत भरूचा हिने तिच्या इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा फोटोही शेअर केला. हा फोटो शेअर करताना नुसरतने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. नुसरतच्या चाहत्यांना अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींसोबतची (PM Narendra Modi) ही भेट आवडली आहे. नुसरतने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि युद्धाच्या काळात इस्रायलमधून (Israel) तिला परत आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
(हेही वाचा – व्यायामशाळा मालक रझा खानने हिंदू तरुणीला अडकवले Love jihad च्या जाळ्यात; आधी अत्याचार, मग धर्मांतरणासाठी दबाव)
आभार मानणे, हे एक भाग्य
नुसरत आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही भेट एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात झाली. इंस्टाग्रामवर या भेटीची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करताना नुसरत यांनी लिहिले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मोदीजी, तुमच्या अटल नेतृत्वाबद्दल आणि अलिकडच्या संघर्षादरम्यान इस्रायलमध्ये अडकलेल्या माझ्यासह भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी तुमच्या सरकारने केलेल्या त्वरित कारवाईबद्दल वैयक्तिकरित्या आभार मानणे, हे एक भाग्य आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये नुसरतने पंतप्रधान मोदींसाठी गुजरातीमध्ये एक कॅप्शन देखील लिहिले आहे – “तुम्हाला भेटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे माझ्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय राहील.”
२०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात नुसरत तिच्या चित्रपटासाठी इस्रायलला पोहोचली होती. नुसरत इस्रायलमध्ये असताना इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध (Israel-Hamas war) सुरू झाले. सर्वत्र बॉम्ब आणि बंदुकांचे आवाज घुमू लागले. अडचणीत सापडलेल्या नुसरतने याविषयी भारत सरकारकडे मदत मागितली होती. यानंतर, भारत सरकारने इस्रायल सरकारसोबत मिळून नुसरतची सुटका केली आणि तिला भारतात आणण्यात आले. त्या वेळीही नुसरतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून भारत सरकारचे कौतुक केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community