काँग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानची हुजरेगिरी! आयएसआयच्या एजंटला दिलेला राजाश्रय

117

सध्या पाकिस्तानातील तथाकथित पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्याने ‘आपण पाच वेळा भारतात आलो होतो, सात शहरे फिरून माहिती घेऊन ती आयएसआयला पुरवली आहे’, अशी कबुली दिली आहे. याच पत्रकाराला काँग्रेसच्या राजवटीत यूपीए-२ च्या काळात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दहशतवादावरील एका परिसंवादासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानची हुजरेगिरी करण्यात आली, आयएसआयच्या एजंटला राजाश्रय दिला होता, अशी चर्चा रंगू लागली आहे.

नुसरत मिर्झा असे या आयएसआय एजंटचे नाव आहे. तो स्वतःला पत्रकार म्हणवतो. व्यवसायाने तो इस्लामाबाद येथे इंजिनियर आहे. नुसरत 2005 ते 2011 दरम्यान पाच वेळा भारताला आला होता. 2010 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्याला भारतात दहशतवादावरील परिसंवादासाठी आमंत्रित केले होते, ज्यामध्ये नुसरत हा प्रमुख पाहुणा होता. यानंतर 2011 मध्ये मिल्ली गॅझेटचे संस्थापक आणि संपादक जफरुल इस्लाम याला बोलावले होते.

नुसरत मिर्झाची कबुली

या व्हायरल व्हिडिओमध्ये नुसरत मिर्झा म्हणतो की, तुम्ही आणलेली माहिती जनरल अशफाक कियानी (आयएसआयचे महासंचालक) यांना द्या, मी म्हणालो, मी तुम्हाला देणार नाही, मग आयएसआय ब्रिगेडियरचा फोन आला. अशी आणखी माहिती उपलब्ध असल्यास बरे होईल. माझ्याकडील माहिती पुरेशी नसली तरी जेवढी आहे त्यावरून काम करा.  आयएसआयला तिथली परिस्थिती माहीत आहे. त्यांना तिथल्या सर्व शहरांची माहिती आहे. त्यांची जीवनशैली कशी आहे? त्यांचे कमकुवत मुद्दे काय आहेत? आमच्या आयएसआयला हे सर्व माहीत आहे. मी भारतात गेलो, चंदिगडमध्ये दहा दिवसांसाठी, त्यानंतर हैदराबाद डेक्कन बंगळुर तसेच २००६मध्ये चेन्नई येथे गेलो. यानंतर महिनाभरासाठी कोलकाता येथे गेलो. पाटणा, लखनऊ येथेही गेलो. त्या वेळी माझ्याकडे अलाहाबादचा व्हिसाही होता. तेव्हा कसुरी साहेब परराष्ट्र मंत्री होते. (खुर्शीद महमूद कसुरी – 2002 ते 2007 पर्यंत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री), त्यांनी मला सात शहरांचा व्हिसा दिला होता. भारतातील लोक तीन शहरांसाठी व्हिसा देतात, त्यांनी मला सात शहरांसाठी व्हिसा मिळवून दिला. पण मी अलाहाबादला जाऊ शकलो नाही, तिथे कर्फ्यू होता. तिथले उर्दू वृत्तपत्रांचे सर्व संपादक माझे मित्र आहेत, जे टीव्ही चॅनेल्स आहेत, जेव्हा मी जायचो तेव्हा दहा-वीस वृत्तवाहिन्यांना मुलाखती द्यायचो. 2010 मध्ये मला पुन्हा बोलावण्यात आले, त्यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मला निमंत्रित केले होते. दहशतवादावरील चर्चासत्रासाठी हे निमंत्रण दिले होते.

(हेही वाचा मुंबईकरांची ५० टक्के तहान भागेल एवढा तलावांत जमा झालाय पाणीसाठा)

काँग्रेसकडून सारवासारव 

नवभारत टाइम्सने काँग्रेस पक्षाचे नेते उदित राज यांना नुसरत मिर्झाच्या कबुली जबाबावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे सांगितले. संपूर्ण शहरात जाऊन फिरा, लाखो लोकांचे विवाह होत असतात. मुझफ्फरक नगरमध्येही लग्ने होतात. लोक येत-जात असतात. एक नाही तर हजारो लोक येत-जातात. तुम्ही कोणताही अर्थ नसताना प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य वाटले. तुम्ही लोक विनाकारण वेळ वाया घालवत आहात.

पदावरून बाजूला होताच हमीद अन्सारी यांचे शब्द बदलले

हमीद अन्सारी हे UPA सरकारच्या काळात 2007 ते 2017 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते. 1961 मध्ये त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली आणि त्यांनी चार दशके ते कार्यरत होते. 90 च्या दशकात त्यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी बनवण्यात आले. ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षही होते. हमीद अन्सारी हे त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम अडचणीत सापडायचे. उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर ते म्हणाले होते की, भारतात असहिष्णुता वाढली असून सांस्कृतिक राष्ट्रवादाची काल्पनिक व्यवस्था लागू करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.